हुबळी/प्रतिनिधी
सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांचे आंदोलन सुरु आहे. यातच आता त्यांच्या कुटुंबीयांनीही भाग घेत सरकारचा निषेध केला आहे. सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी व्हावी यासाठी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी थाळी वाजवून निदर्शने केली. निदर्शने केली. शहरातील गोकुळ रोड येथे असलेल्या परिवहन महामंडळाच्या क्वार्टर्ससमोर निदर्शने त्यांनी केली.
सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकार दडपशाहीचे धोरण अवलंबत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आमची मागणी न्याय्य आहे. उगाडी उत्सव झाल्यानंतरही मार्च महिन्यात झालेल्या कामांचे वेतन दिले नाही. सरकारची कामगारविरोधी भूमिका आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकार दडपशाहीचे धोरण अवलंबत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
गेल्या सात दिवसांपासून संपानंतरही सरकार बदली व निलंबनाची कारवाई करीत आहे. शांततेत निदर्शने करूनही सरकार कारवाई करीत आहे. कोणतीही केस नोंदवा, आम्हाला त्याची चिंता नाही, असे म्हंटले आहे.









