बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील विविध परिवहन महामंडळांतील कर्मचारी आज (मंगळवारी) बेंगळूर येथील फ्रीडम पार्क येथे प्रतीकात्मक उपोषणकरणार आहेत. अनेक मागण्यांसाठी याआधीही कर्मचाऱ्यांनी उपोषण केले होते. पण आज पर्यंत त्यांना आश्वासनावर ठेवण्यात आले आहे. दरम्यान अधिवेशनाच्या तोंडावर कर्मचारी आपल्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.
प्राण कर्मचाऱ्यांनी आपल्याला सरकारी कर्मचारी समजून कर्नाटक विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही घोषणा करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
आंदोलनात बीएमटीसी, केएसआरटीसी, एनडब्ल्यूकेआरटीसी आणि एनईआरटीसी मधील कर्मचारी या संपात भाग घेतील. निदर्शकांमध्ये ड्रायव्हर्स, कंडक्टर आणि मेकॅनिकचा समावेश होता.