ऑनलाइन टीम / लाहोर :
पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टाने माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा बेकायदा असल्याचे सांगत ती रद्द करण्यात आली आहे. जनरल परवेझ मुशर्रफ (निवृत्त) यांना पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने देशद्रोह असल्याचे सांगत फाशीची शिक्षा सुनावली होती.
या निर्णयाला मुशर्रफ यांनी लाहोरच्या हायकोर्टात आव्हान दिले होते. ज्यानंतर लाहोर हायकोर्टाने आज ही फाशीची शिक्षा रद्द केली आहे. लाहोर उच्च न्यायालयाने, मुशर्रफ यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावणाऱया विशेष न्यायालयालाच असंवैधनिक म्हटले आहे. त्यामुळे, परवेश मुशर्रफ यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षाही रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, 17 डिसेंबरला पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष यांना देशद्रोही ठरवलं. त्यानंतर पाकिस्तानी घटनेनुसार अनुच्छेद सहा अन्वये फाशीची शिक्षा सुनावली होती.









