ऑनलाईन टीम / बीड
संपुर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर ही भाविक असणाऱ्या तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मंदिर व्यवस्थानाकडे ५० लाखांची मागणी करत पैसे न दिल्यास वैजनाथ मंदिर उडवण्याची धमकी दिली असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. या आशयाचे पत्र बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मंदिर समितीस पत्र प्राप्त झाल्याने सध्या खळबळ माजली आहे. हे पत्र वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र प्राप्त झाले आहे. या मुळे परळी शहर पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे ही स्पष्ट झाले आहे.
वैजनाथ मंदिर समितीस प्राप्त झालेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातली सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. या पत्रात “वैजनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा RDXने मंदिर उडवून देवू”, अशा आशय दिला आहे. तसेच आपण फार मोठ्या मंदिर संस्थानाचे विश्वस्त आहात.
आत्तापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ रक्कम देणगी रुपाने मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड आहे. मला ५० लाख रुपयांची तातडीने गरज आहे. हे पत्र मिळताच दिलेल्या पत्त्यावर रक्कम पोच करावी, अन्यथा मी वैजनाथ मंदिर माझ्याकडच्या RDX ने उडवेन. असल्याचे ही स्पष्ट झाले आहे. त्यापत्रामुळे सध्या एकच खळबळ माजली असून संस्थानाच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पत्राच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातली सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.








