प्रतिनिधी / सातारा :
परळी (ता. सातारा) भागात आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटात फूट पडली आहे. परळीतील शिवेंद्रसिंहराजेंचे कट्टर समर्थक राजू भोसले यांच्या बोटाला धरुन राजकारणात आलेले शशी वाईकर यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी दीपक पवार, गुलाबराव चव्हाण, दीपक चाळके सचिन जाधव आधी परळी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.









