वार्ताहर / बाळेपुंद्री
सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगराला मंगळवारी गोरवगुडगी पीठाचे बालतपस्वी अवतार पुरुष पुण्यकोटी प. पू. श्री परलिंगेश्वर महास्वामी यांनी भेट देऊन यल्लम्मा देवीचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिराचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवी कोटारगस्ती यांच्या हस्ते प. पू. श्री परलिंगेश्वर महास्वामी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंदिराचे साहाय्यक कार्यनिर्वाहक अधिकारी अरविंद मळगे, सौंदतीचे एएसआय एस. आर. गिरीयाल, पंडित यडूरय्या, मंजुनाथ संदीमनी, आर. एच. सवदती, सदानंद ईटी, सुभाष पाटील, देवस्थान कमिटीचे सदस्य, कर्मचारी आणि पुजारीवर्ग उपस्थित होता.









