सातारा / प्रतिनिधी
कोरोनामुळे हातचे काम गेले. काम नसल्याने कुटुंबातील सदस्यांचे हाल होऊ लागले.हाल होऊ नयेत याकरता आपल्या गावाची ओढ लागलेल्या कामगार शासनाने परवानगी देताच मिळेल ते वाहन भेटेल ती गाडी करून जाऊ लागले. काही मजूर स्वतःच्या गावात पोहचले आहेत. तर काहीजण मार्गस्थ होत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने मिळालेल्या परवानगीने ते रवाना होत आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यलयातून जाणाऱ्यांना ऑन लाईन परवाना मिळवून दिला जात आहे.
माणूस पोटासाठी काम मिळेल तेथे जात असतो. आपले घर बसवत असतो. भारतात कोठेही लोकशाहीने वास्तव्य करता येते. मात्र, कोरोनाच्या भयाण संकटामुळे लॉकडाऊन केले. लॉकडाऊनमुळे अनेकांचे काम गेले. अनेकांचे पोटाचे हाल झाले. आपल्या गावाची आपल्या भागाची आठवण मजुरांना झाली.गड्या आपला गाव बरा म्हणत गावच्या ओढीने मिळेल त्या गाढीने चालू लागले. पण वाटेत पोलीस आडवे, प्रशासन आडवे येत होते.जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जाणारे अडकले होते. सातारा पोलिसांनी ही बंगलोरहुन मध्यप्रदेशाला निघालेले वाटेत अडवून यशोदा शिक्षण संस्थेत त्यांची सोय केली होती.ते मुजर परवानगी मिळताच पुढची वाट चालू लागले.ते ही वाहनाने.जिल्हा प्रशासनाने मजुरांना परवाने देण्यास प्रारंभ करताच जिल्ह्याबाहेर जाण्यास लोकांचे लोंढेच्या लोंढे सुरू झाले. कोणी खाजगी वाहन ठरवून आपल्या कमाईचे गाठोडं घेऊन चालू लागले.कोणी ट्रक तर कोणी बस.आपल्या चिल्यापिल्याचा संसार घेऊन ही त्यांच्या गावी चालू लागली असल्याचे चित्र सध्या अगदी जिल्ह्यातील प्रमुख शहरापासून गावागावात दिसत आहे.
आरटीओ संजय राऊत यांचे ही सामाजिक कार्य
हळव्या मनाचा अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते सातारचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत. हे राऊत यांनी ज्यांना बाहेर जिल्ह्यात जायचे आहे त्यांच्या करता ऑनलाईन परवाना देण्याची सोय केली आहे. तसेच काही मजुरांना तर त्यांनी खाजगी ट्रॅव्हल्स चालकांना विनंती करून माफक दरात सोय करून दिली जात आहे. त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
आलेल्या संकटात मदत करतो तोच खरा माणूस.मदत ही उपकाराच्या भावनेने न करता समाजाप्रती काहीतरी देणं लागतो या जाणिवेतून भाजपची सातारा टीम काम करते आहे.जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असून अगदी ऑन लाईन पास मिळवून देण्यापासून बस व वाहन देण्यापर्यंत ते एकाच ठिकाणी मजूर असतील तर तेथे डॉक्टर नेऊन सुविधा देत आहेत.मजूर पोहचल्यानंतर फक्त आभाराचा छानसा मेसेज येत आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनामुळे खूपच बिझी शेड्युल आहे. स्थलांतराची जबाबदारी उपजिल्हाधिकारी विधुत वरखेडकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याना गेले दोन दिवस फोन वरून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फोन बिझी येत होता. त्यामुळे नेमके जिल्ह्यातील मजूर किती गेले हे समजू शकले नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








