प्रतिनिधी / पणजी
लॉकडाऊनच्या काळात शेजारी राज्यात अनेक गोमंतकीय कामगार तसेच विद्यार्थी अडकले आहे त्यांना पुन्हा गोव्यात आणण्यासाठी सरकार काहीच हालचाली करत नाही, सरकारने या सर्व लोकांना पुन्हा आपल्या मायभुमित आणावे, अशी मागणी शिवसेना राज्यप्रमुख जितेश कामत यांनी केली.
महाराष्ट्रात पुणे येथे अनेक कामगार अडकून पडले आहेत त्यांनी गोवा सरकारकडे अनेक वेळा निवेदन केले आहे. या विषयी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन पेले आहे. पण मुख्यमंत्री काहीच प्रतिक्रीया देत नाही. तसेच मुंबईतील टाटा इस्पीतळामध्ये गोमंतकीय दोन मुलांना कर्करोगाने ग्रासले आहे त्यांना व त्यांच्या कुटुंबाला गोव्यात अजून आणले जात नाही. त्यांना फक्त हवाई मार्गाने गोव्यात आणता येते. सरकारने याची दखल घ्यवी.
पुणे आयटीक्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांना महाराष्ट्र सरकाराने गोव्यात जायला परवानगी दिली आहे त्यांनी पोलिस स्थानकात अर्ज केल्यावर त्यांना परवानगी मिळते पण वाहतूक सेवा नसल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकारने त्याच्याविषयी विचार केला आहे, पण गोवा सरकार काहीच करत नसल्याचे आरोपही यावेळी शिवसेना राज्यप्रमुखांनी केला.
महागाईवर सरकारचे नियंत्रण नाही सध्या जग तसेच देश कोरोनाच्या संकटाशी लढत आहे. अशा परिस्थिती सरकारने पेट्रोल डिझेलच्या तसेच अन्य सर्व आत्याआवश्यक वस्तू महाग करुन सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास दिला आहे. सध्या देशची आर्थिक परिस्थिती कालमोडली आहे s.अशा पारिस्थितीत महागाई झाल्याने लोकांची तारांबळ उडाली आहे. लोकाना खायला अन्न मिळणार नाही, त्यामुळे सरकारने महागाईवर नियंत्रण अणावे, असेही यावेळी जितेश कामत यांनी सांगितले.









