जगभरात वाढत्या मागणीचा प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून जवळपास 1.55 लाखाहून अधिक लोक या विषाणूमुळे बाधीत झाले आहेत. यातील 5,800हून अधिक जण मृत्यू पावले आहेत. सध्या भारतामध्येही याने शिरकाव केला असून 100 हून अधिक कोरोना बाधीत झाले आहेत. यातील तीन जण दगावले आहेत. या विषाणू संसर्गाला जागतिक आरोग्य संघटनेकडून महामारी घोषित केली आहे. याचदरम्यान हॅन्ड सॅनिटायजरची वाढती मागणी लक्षात घेत परफ्यूम आणि पेय पदार्थाचे उत्पादन करणाऱया कंपन्या आता सॅनिटायजर व्यापारात उतरणार असलयाची घोषणा केली आहे.
फ्रान्सची लक्झरी कंपनी
फ्रान्समधील लक्झरी गुड्स समूह एलव्हीएमएच यांच्याकडून इस्पितळात लागणाऱया हात धुण्यासाठी वापरण्यात येणाऱया सॅनिटाजरची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्या परफ्यूम कारखान्यात हॅन्ड सॅनिटाजरचे उत्पादन सुरु केले आहे.
ब्रुकलिन कंपनी
न्यूयॉर्कमधील डिस्टिलायजिंग कंपनीने हॅन्ड सॅनिटाजरचा व्यवसाय सुरु केला आहे. कारण रेस्टॉरन्ट, बार, लिकर स्टोरमध्येही आता हॅन्ड सॅनिटाजर सक्तीचे केले आहे. दुसरीकडे शाइन डिस्टिलरी आणि ग्रिल पोर्टलँडमध्ये सॅनिटाजर निर्माण करत असून विविध लोकांनी स्वच्छतेसाठी सॅनिटाजरचा वापरावर भर देण्याची गरज असल्याचे कंपनीचे मालक जॉन पोटेनेट म्हटले आहे.
कोको रम सॅनिटाजर
वॉशिंग्टनमधील मिक्सोलॉजिस्ट टॉड थ्रॅशर, जो व्हार्टफवर पोटोमॅक डिस्टिलरी आणि टिकी टीएनटी चालवते. या कंपनीने नारळ तेल, चहाच्या झाडाचा अर्क यांना एकत्र करुन सॅनिटाजर बनवत आहे. तर घरातील जवळपास 140 रम ठेवली होती त्याचा वापर करुनही व्यापार सुरु केला आहे. कंपनीच्या मालकानी यावेळी सांगितले की आम्ही तीन वेगवेगळी सॅनिटाजर तयार केले आहेत.
जिन सॅनिटाजर
सायकोपॉम्प मायक्रोडिस्टिलरी वर्षाला जवळपास 15,000 लिटर जिनचे उत्पादन करत असते. जिसने मार्चमध्ये सुरुवातील हॅन्ड सॅनिटाजर तयार करण्याचे काम सुरु केले आहे. जे घरगूती स्वरुपात सर्वत्र विकले गेले. याच्या निर्मितीसाठी बॅटोनिकलसोबत जिनसह इथेनॉलचाही वापर करण्यात येत आहे. ज्यामध्ये 65 टक्के इथेनॉलचाही समावेश आहे. सायकोपॉम्प कंपनीचे दररोज उत्पादन सुरु आहे.









