सण-समारंभ असो किंवा लग्न, सुंदर कपडे आणि या कपडय़ांना शोभणार्या दागिन्यांसोबतच मेक अपही चांगला असायला हवा. भरजरी साडी किंवा ड्रेस, त्यावर भरपूर दागदागिने घातल्यानंतर बटबटीत मेक अप चांगला दिसत नाही. प्रसंग, पेहराव आणि दागिने या सगळ्याचा विचार करूनच मेक अप करायला हवा.
* पेहरावासोबत सोन्याचे किंवा गोल्ड पॉलिशचे पारंपरिक, जड दागिने घालणार असाल तर त्यावर सौम्य आणि सोबर मेक अप हवा. मेक अप आणि दागिने यांचा समतोल साधण्यासाठी 60 च्या दशकात लोकप्रिय झालेला विंग्ड आय मेक अप करता येईल. डोळे अधिक आकर्षक दिसण्यासाठी मस्काराचे दोन थर लावा. ओठांचा मेक अप सौम्यच ठेवा.
* एकाच रंगाच्या ड्रेसवर स्टोनची हेवी ज्वेलरी घालणार असाल तर तुम्ही स्मोकी आय मेक अप करू शकता. हटके लूकसाठी गोल्ड आणि ग्रीन आयशॅडो एकत्र करून लावता येईल. ब्राँज गोल्ड ब्लशर आणि कोरल लिपस्टिकने तुमचा लूक खुलवा.
* कुंदन ज्वेलरी कॅरी करणार असाल तर ग्रीन आयशॅडो लावा. यासोबतच ब्रो बोन म्हणजे भुवयांच्या खालच्या भागात गोल्डन डस्ट लावता येईल. यासोबत थोडं गडद काजळ लावा. सोबर लूकसाठी गुलाबी ब्लशर आणि लिपस्टिक लावा.
* हिर्याच्या किंवा अमेरिकन डायमंड ज्वेलरीसोबत माईल्ड ग्रे स्मोकी आय लूक शोभून दिसतो. तसंच विंग्ड आय लायनर, काजळाचा जाडसर थर आणि मस्काराही छान दिसतो. सौम्य लूकसाठी पीच ब्लशरसोबत पीच शिमर वापरा. रोझी पिंक लिपस्टिक आणि डार्क ब्राउन ऍब्रो पेन्सिलचा वापर करा.
* वेस्टर्न ड्रेसवर काळ्या किंवा पांढर्या मोत्यांचे दागिने घालणार असाल तर पर्ली व्हाईट आयशॅडो लावा. मस्काराचे दोन-तीन थर द्या. यासोबत लाईट कोरल ब्लशर आणि पीच किंवा लाईट ऑरेंज लिपस्टिक लावा. तुम्ही गडद लाल रंगाची लिपस्टिकही लावू शकता. * सोन्याच्या दागिन्यांसोबत मॅटेलिक मेक अप छान दिसतो. यासाठी सोनेरी आयशॅडो लावता येईल. जाडसर लायनर लावल्यानंतर मस्काराचे दोन थर द्या. लाईट कोरल किंवा पीच ब्लश आणि केशरी छटेची लिपस्टिक लावा.