प्रतिनिधी / बेळगाव :
लॉकडाऊनच्या कालावधी परप्रांतीय कामगारांनी स्थानबद्ध केलेल्या ठिकाणी रहावे तसेच तेथून कोठेही बाहेर जाण्यासाठी धडपड करू नये त्यांना तेथेच आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्यात येईल असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सांगितले. गुरूवारी त्यांनी समाजकल्याण खात्याच्या वसतीगृहात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय कामगारांची भेट घेतली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून विशेष सूचना केल्या.
मागील पंधरा दिवसापासुन या कामगारांसाठी निवास, आहार आणि भोजन व्यवस्था या वसतीगृहात करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी आवश्यक सहकार्य तसेच वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भात कोणत्याही स्वरूपात कुचराई करू नये असे त्यांनी अधिकाऱयांना सांगितले. या कामगारांना त्यांच्या राज्यामध्ये परत पाठविण्यात तुर्तास अडचणी आहेत. मात्र त्यांच्या या वास्तव्य काळात त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अनिल बेनके, मनपा आयुक्त के. एच. जगदीश उपस्थित होते.









