मेढा / प्रतिनिधी :
मेढा-मोहाट पुलाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी वेण्णा नदीत आढळून आला होता. ही बाब मेढा पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक लोकांच्या सहाय्याने मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी मेढा ग्रामीण रुग्णालयात आणला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून मृताचे नाव नारायण रायभोई असल्याचे समजले.
मृत व्यक्ती परप्रांतीय असून, त्याचे वय 40 वर्ष होते. सदर व्यक्ती मेढ्यातील एका मटणाच्या दुकानावर कामाला होती. दारूच्या नशेत वेण्णा नदीवर मासे पकडण्यासाठी गेला असता नदीत पडला. पाण्यात डोक्याला जखम होऊन त्यातच या व्यक्तीचा मृत्य झाला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. या घटनेचा अधिक तपास मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली विकास शिंदे, अमोल पवार, नितीन कनाके करत आहेत.









