यड्राव / प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन असलेने हाताला काम नाही काही कारखानदारांनी आर्थिक मदत केली परंतु काही कारखानदारांनी परप्रांतीय कामगारांकडे पाठ फिरवल्याने खायला अन नाही व गावी जाण्यासाठी पैसे नाहीत अशी अवस्था आहे आता थोड्या प्रमाणात कारखाने सुरू झाले आहेत परंतु कामावर गेले तर या महिन्याचा पगार मिळणार नाही गावी जावे तर प्रशासकीय मंजुरीसाठी बराच वेळ लागत आहे रेल्वे सेवा कधी सुरू होणार हे सांगता येत नाही त्यामुळे अशा परप्रांतीय कामगारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे.
यड्राव तालुका शिरोळ येथील पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात असल्याने उत्तर प्रदेश बिहार राजस्थान झारखंड ओरिसा कर्नाटक आधी भागातील हजारो कामगार येथे वास्तव्यास आहेत. परंतु कोरोना या रोगामुळे लॉकडाऊन वाढतच गेले त्यामुळे हाताला काम नाही खिशात पैसे नाहीत अशा अवस्थेत दोन महिने कसेबसे काढले अद्यापि या रोगाचा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे लॉकडाऊन कधी उठणार यावर प्रश्नचिन्ह आहे परप्रांतियांच्या घरच्या मंडळीकडून घरी येण्याचा आग्रह सुरू आहे. त्यामुळे हजारो परप्रांतीय कामगारांनी ऑनलाईन अर्ज केला आहे. तसेच मेडिकल सर्टिफिकेट तयार केले आहे परंतु गेल्या 15 वर्षापासून रेल्वे सेवा कधी सुरू होणार त्याची माहिती कोणालाही नाही दोन राज्य व केंद्र शासन यांचा समन्वय साधून निर्णय होणार असल्याने विलंब लागत आहे. सध्या काही प्रमाणात कारखाने सुरू झाले आहेत. जर कामावर गेले तर याचा पगार मिळणार नाही. तसेच केव्हाही गावी जाण्याचा मेसेज येईल व आपल्याला गावी जावे लागेल या विवंचनेमुळे कामावर जाणे टाळत आहेत. कारखानदार हे हे कामावर गावी जाणार असल्याने त्यांना कामावर ठेवण्यास टाळाटाळ करीत आहेत तसेच आर्थिक मदत हे पूर्णपणे बंद केले आहे त्यामुळे अशा परप्रांतीय कामगारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
याप्रश्नी प्रशासनाने जलदगतीने निर्णय घेणे आवश्यक आहे. कारण या परप्रांतियांच्या गावी जाण्यावरून अनेक अफवा पसरविल्या जात आहेत त्यात नेमकं खरं काय खोटं काय हे कोणाला सांगता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने पुढाकार घेऊन रेल्वे बाबत कोणता निर्णय झाला याचा खुलासा करणे गरजेचे आहे. जर रेल्वेला विलंब होत असेल तर काही परप्रांतीय खाजगी बसने आपल्या गावी जाऊ इच्छितात त्यांना परवानगी द्यावी असे अनेक परप्रांतीयांची मागणी आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








