सांगली : प्रतिनिधी
नोकरी तसेच शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या ५० नोकरदार आणि विद्यार्थ्यांना शहरातील जामवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस देण्यात आली. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. दरम्यान टोकियो येथे होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंना ही प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.
नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अशा नागरिक, विद्यार्थ्यांना वेळेत लस उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. येथील जामवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आतापर्यत ५० नागरिक, विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी महापालिका उपायुक्त राहुल रोकडे , उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. सुनील आंबोळे , डॉ. रवींद्र ताटे, डॉ.वैभव पाटील, डॉ. वर्षा पाटील आदी उपस्थित होते.
Previous Articleकोरोना काळातील विद्यार्थ्यांची फी माफ करा
Next Article मिरजेत झाडांची बेकायदेशीर कत्तल








