कृष्णात पुरेकर / कोल्हापूर
पुण्यात आईवडिलांसमवेत रमलेली चिमुकली बहिणभाऊ.. हळूहळू शिक्षणही सुरू झालेलं.. अन् गतवर्षी कोरोना दाखल झाला.. या महामारीनं देशभर लॉकडाऊन झालं. वर्क फ्रॉम होम सुरू झालं. पण काहींना मात्र रोजगार सोडून गावी परतावं लागलं.. गावपांढरीत आलं.. कोरानाची पहिली लाट ओसरली.. पुन्हा निघण्याची तयारी.. पण तोपर्यत आईबाबांना कोरानानं गाठलं.. त्यांनी लांबूनच मुलांना ‘परत येतो..,’ असं सांगितलं. त्यानंतर आजपर्यत त्यांचं दर्शन नाही.. चिमुकल्यांच्या नजरा आजही त्यांच्या वाटेकडं लागलेल्या..!
जिल्हय़ातील दुर्गम गाव.. गावाकडं थोडीफार शेती.. त्यामुळे नोकरीसाठी तो पुण्याला गेला.. तेथे खासगी संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. विवाहानंतर पत्नीसह पुण्यात राहू लागला. संसारवेलीवर दोन फुले फुललेली.. अधूनमधून गावी यायचा.. पण गतवर्षी मार्चमध्ये आलेल्या कोरोनानं लॉकडाऊन केलं. काही दिवस पुण्यात काढल्यानंतर तोही बिऱहाड घेऊन गावी परतला.. कोरोना संपेपर्यत गावपांढरीत थांबायंचं.. या हेतूनं छोटीमोठी कामं करू लागला.. कोरोनाची पहिली लाट ओसरली.. अन् पुन्हा कुटुंबाला पुण्याचे वेध लागले..
पुण्याला नोकरीच्या ठिकाणी रूजू होण्यासाठी त्याची तयारी सुरू झाली. अन् त्यातच दुसऱया लाटेत त्याला संसर्ग झाला, पत्नीही संसर्गित झाली. दोघांचाही स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, अन् मुलांना त्यांनी लांबूनच टाटा करत.. बाळानों.. परत येतो, असं सांगितलं, अन दुचाकीवरून ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तेथे डोळयांसमोर पत्नीनं प्राण सोडला, अन् तो खचला.. त्यानंतर दोनच दिवसांत त्यानेही जग सोडलं.. सोबत आणलेली दुचाकी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये तशीच.. दोघांच्याही अंत्यसंस्काराला भाऊ अन् मेहुणा होता..
मुलगा, सुनेच्या अचानक जाण्यानं कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला.. पण या चिमुकल्यांना कोण सांगणार.. आजी.. आजोबा.. चुलते, मामांनी समजूत काढली.. पण आजही हे चिमुकलं भाऊबहीण.. पफ्पा-मम्मीच्या येण्याकडं डोळं लावून बसलेलं.. त्यांना आशा आई ते परत येतील.. याची.. पण ते या जगात नाहीत.. कोरोना त्यांना घेऊन गेलाय.. हे सांगण्याचं धारिष्टय़ कोणामध्येच नाही. या चिमुकल्यांची नोंद महिला, बालकल्याण विभागाकडे झालीय.
मोलमजुरी करणारं दांपत्य.. त्याची दोन चिमुकली.. त्याचंही असंच झालं. अल्पभुधारक अन् छोटीसी झोपडी हेच त्याचं घर. पारंपरीक व्यवसाय करताना संसर्ग झाला, अन् दोघांनीही या जगाचा निरोप घेतला.. ही बहिणभाऊही आज पोरकी झाली आहेत.. जिल्हय़ात आई किंवा वडील कोरोनानं गमावलेली पावणेदोनशे बालकं आहेत.. काहींनी आईला आधी गमावलं.. तर वडिलांना कोरोनानं नेलं. काहींच्या वडिलांना कोरोनानं पहिल्या लाटेत नेलं., दुसऱया लाटेत त्यांनी आईला गमावलं.. परत येतो.. म्हणून सांगून गेलेल्या आई अन् वडिलांच्या प्रतीक्षेत ही बालकं आज कुटुंबासाठी पोरकी झाली आहेत.. कोरोनानं अशा अनेकांना पोरकं केलेय. कोरोनाच्या या ब्लॅक शॅडो अनेक आहेत.. पण त्यातून आशेचा किरण म्हणून या चिमुकल्यांना सावरण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. त्यातूनच.. तुमच्या पेम आपुलकी अन् मदतीने त्यांचा उद्याचा उषकाल अधिक सुखमय होण्यासाठी मदतीचे हात पुढे यावेत.. हीच ब्लॅक शॅडोमधून अपेक्षा…
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









