प्रतिनिधी / कणकवली:
गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी रा. प. सिंधुदुर्ग विभागाच्या आतापर्यंत 133 गाडय़ांचे बुकींग झाले आहे. 14 सप्टेंबरपर्यंतसाठी सदर बुकींग असून या कालावधीत आणखी काही गाडय़ांचे बुकींग होण्याची शक्यता असल्याचे रा. प. विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
आतापर्यंत झालेल्या बुकींगमध्ये 101 नियमित तर 32 ग्रुप बुकींगच्या गाडय़ांचा समावेश आहे. आतापर्यंत 117 गाडय़ा रवाना झाल्या आहेत. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठीची सोय एस. टी. महामंडळाने केली आहे. त्यासाठी ऑनलाईन व ग्रुप बुकींग उपलब्ध करण्यात आले आहे. आतापर्यंत 133 गाडय़ांचे झालेले बुकींग हे 14 सप्टेंबरपर्यंतसाठी असून या कालावधीत आणख काही गाडय़ा बुकींग होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.









