बांबवडे/प्रतिनिधी
परखंदळे ता. शाहूवाडी येथील रेशन दुकानदार शंकर निवृती पाटील यांनी अपत्या पंचवीस वर्षाच्या काळात मोठा भ्रष्टाचार केला असून त्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्यांनी निवेदनाव्दारे केली आहे. वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात अलेल्या निवेदनात म्हटले आहे की शकर निवृत्ती पाटील हे १९९७ पासून गावात स्वस्त दुकान चालवत आहेत. त्यांनी आता पर्यत ३४ मयत लोकांचे नावे १२ टन धान्यसाठा बोगस पावतीच्या आधारे ऊचलला आहेत. तसेच ५७ मुली लग्न होऊन सासरी गेल्या त्यांचे नावे धान्य उचलत आहेत.
काही रेशनधारकांचा ऑनलाईन अंगठा लागत नाही अशांना धान्य येऊनही धान्य दिले जात नाही, रेशन कार्ड खराब असेल तर त्यांनाही धान्य नाकारले जाते, गावातील प्राप्त रेशनधारकांचे धान्य नाकारून त्यांना दमदाटी केली जात आहे, तसेच कोरोना संसंर्गच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांना जे धान्य आले होते.त्यातही शासन नियमा प्रमाणे धान्य देण्यात अलेले नाही. लाभार्थी वंचित ठेवले आहेत. या बाबत तालुका तहसिलदार यांचेकडे तक्रार केली असता या कार्यालयातील चौकशी अधिकाऱ्यांनी रेशन दुकानदारांचे घरी जाऊन चौंकशी करून त्यांनाच पाठीशी घालण्यात येत आहे. सर्व लेखी पुरावे देऊनही तालुका तहसिल विभाग योग्य ती कारवाई करत नाही म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषन करणार असा ईशारा देण्यात अला आहे. निवेदनावर सिताराम पाटील, भरत सुतार, भिमराव दळवी, निवास लव्हटे,, बाबूराव सुतार यांच्यासह शेकडो लोकांच्या सह्या आहेत.
रेशन धानाच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार संबंधीत दुकानदार शंकर पाटील यांना विचारले असता ते म्हणाले गावकऱ्यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत .मी भ्रष्टाचारासाऱखे कोणतेही कृत्य केलेले नाही माझ्यावर केलेल्या तक्रारीनुसार शासनाने नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन शिल्लक साठा आवक जावक राजिस्टर तपासले आहे.मी कोणत्याही मयताच्या नावे धान्य उचललेले नाही . माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत.
Previous Articleरत्नागिरी : मोरवंडेत होम क्वारंटाईन वृद्धाची आत्महत्या
Next Article पुणे विभागात 3321 रुग्ण कोरोनामुक्त








