पन्हाळा / प्रतिनिधी
कोरोना महामारी मुळे सर्वच व्यवसायात मंदी निर्माण झाले आहे .पन्हाळगडावर पर्यटनव्यवसाय हा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. मात्र लाँकडॉऊनमुळे येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले होते .याची मोठी किंमत व्यवसायिकांना मोजावी लागली आहे. सध्या पर्यटकांसाठी अनलॉक जरी झाला असला तरी गडावरील ऐतिहासिक वास्तू पुरातत्व विभागाने अद्याप बंद ठेवल्याने येथील गाईड लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसाय देखील दिसून येत आहे .या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते असिफ मोकाशी यांनी मागणी केली आहे .नुकतेच या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्याकडे सादर करण्यात आले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्च 2020 पासून टाळे बंदी करण्यात आली. त्यामुळे पन्हाळा देखील पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले होते .यामुळे येथील व्यवसायिक व गाईड लोकांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने ‘मिशन बिगीन अगेन’ या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने टप्प्याटप्प्याने अनलॉक ची प्रक्रिया राबविली त्यानुसार पन्हाळा देखील एक ऑक्टोबरपासून अनलॉक करण्यात आला .त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला थोडी का होईना चालना मिळाली आहे. पण येथील पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ऐतिहासिक वास्तू अद्याप बंद असल्याने पर्यटकांसह इतिहास प्रेमीच्यात नाराजी पसरली आहे .तर येथील गाईड लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचे प्रकार समोर आले आहेत, अशाच आत्महत्या पन्हाळ्यातील गाईड लोकांच्या होतील .असे या निवेदनात म्हंटले अाहे.
तरी पन्हाळ्यातील ऐतिहासिक वास्तु नियम व अटी ,शर्तीनुसार खुल्या कराव्यात अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते असिफ मोकाशी यांनी केली आहे.यावेळी अँड.मिलिंद कुऱ्हाडे उपस्थित होते.