‘किल्ले पन्हाळगड’ अक्षरांची सर्वांनाच भुरळ:नगरपरिषदेचा उपक्रम:फोटो व सेल्फसाठी ठरणार वरदान
प्रतिनिधी/पन्हाळा
प्रसिद्ध पर्यटन स्थळ तसेच ऐतिहासिक ठिकाण म्हणुन पन्हाळगडाची ख्याती सर्वदुर आहे.पन्हाळा म्हंटले की निसर्गरम्य वातावरण, इतिहासकलीन वास्तु,बुरुज असे चित्र नजरे समोर उभे राहते.त्यामुळे पन्हाळ्याकडे पर्यटकांसह पै-पाहुण्यांचा राबता नेहमीच असतो.अशा प्रसिद्ध पन्हाळा शहराच्या प्रवेशद्वार जवळ मोठ्या अक्षरात उभारण्यात आलेल्या ‘किल्ले पन्हाळगड’ही अक्षरे सर्वांना आकर्षित करुन घेत असल्याने सदरचे ठिकाण लक्षवेधक बनु लागले आहे.
पन्हाळगडाचा मुख्यप्रवेश द्वार असणाऱ्या चारदरवाजा येथील नगरपरिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करुन येथे ‘किल्ले पन्हाळगड’ लिहिली सुमारे एक टन वजनाची अक्षरे याठिकाणी बसवण्यात आली आहे.त्यामुळे या मोकळ्या जागेचा कायापालट झाल्याचे चित्र समोर आले आहे.आज पहिल्याच दिवशी पन्हाळ्यातील बहुतांशी स्थानिक नागरिकांनी याठिकाणा भेट देवुन आपले फोटो व सेल्फी काढण्याची मोह उद्घाटनापुर्वी व लाँकडऊऩ असुन देखील आवराता आला नाही.या ठिकाणीचे फोटो आज सोशल मिडीयावर बहुतांशी पन्हाळकरांनी प्रसारीत केल्याचे देखील दिसुन आले आहे .
पन्हाळा शहराने आता नवी कात टाकली असल्याचे पहावायस मिळत आहे.पन्हाळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानातंर्गत अनेक ठिकाणी सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे.पन्हाळा शहराच्या प्रवेशद्वारात”किल्ले पन्हाळगड”असे लिहुन येथे एक विसावा स्थळ बनविले आहे.त्यामुळे गडावर आगमान होताच या मनमोहक ठिकाणाने सर्वाचे स्वागत होणार आहे.
सध्या कोरोनामुळे पन्हाळा पर्यटकांसाठी बंद असल्याने पन्हाळा सुन्न झाला आहे.जरी नगरपरिषदेने प्रवेशद्वार लक्षवेधक बनविले असले तरी यामुळे याठिकाणी सुट्टीच्या हंगामात पर्यटकांची गर्दी व वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होण्याकडे देखील दुर्लक्ष करुन चालणार नाही.स्थानिक नागरिकांनीची गर्दी ऐवढी होत असेल तर पर्यटकांची केवढी गर्दी होईल .त्यासाठी नगरपरिषदेने भविष्यात यावर काही तरी उपाययोजना करणे देखील गरजेचे बनले असल्याची चर्चा देखील होत आहे.दरम्यान नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी या ठिकाणाचे पुढील काही दिवसात उद्घाटन करण्यात येणार असुन सदरची अक्षरे झाकण्यात येवुन हे ठिकाण बंद करण्यात आले असल्याचे सांगितले.