प्रतिनिधी / पन्हाळा
ऐतिहासिक पन्हाळगडाची महंती सर्वदुर माहिती आहे.त्यातच पन्हाळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ व थंड हवेचे ठिकाण असल्याने पर्यटकांना नेहमीच पन्हाळा खुनवत असतो.सध्या तर पन्हाळ्याने धुक्याच्या धुलईसह हिरवाईची झालर पांघरली आहे.त्यामुळे पर्यटकांचा ओढा जास्त पन्हाळ्याकडे वळत आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे पन्हाळगडावर पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी आदेश झुगारुन पन्हाळ्यात पर्यटक घुसण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यानुसार आज पन्हाळा पोलिसांच्यावतीने विनाकारण पन्हाळ्यावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांना चारदरवाजा येथेच थांबवुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी शाहु जयंती,चौथा शनिवार व सलग रविवार अशी तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याने गेल्या दोन दिवासपासुन पन्हाळ्याकडे व पश्चिमेस मसाईपठाराकडे पर्यटकांच्या गाड्यांची रीघ लागली होती.आज रविवार असल्याने त्यात जास्त भर पडली होती.पन्हाळ्यावर पर्यटनाला अद्याप बंदी असुन देखील पर्यटक विनाकारण गडावर घुसण्याचा प्रयत्न करत आहे.पन्हाळ्यातील मुख्य प्रवेश द्वार असणाऱ्या चारदरवाजा येथे बँरेकट्स लावुन नगरपरिषदेचे कर्मचारी वर्गाच्यावतीने पन्हाळा बंद असुन माघारी जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.पण काही वेळा वादावादीचे प्रकार घडत आहेत.काही पर्यटक चारदरवाजा परिसरात आपली वाहने लावुन नागझरी मार्गे गडावर पायी शिरकाव करतात.तर काही जण चारदरवाजाच्या डोंगरभागात फोटो सेशेन,सेल्फी काढण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.याकारणाने पन्हाळ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेल्या काही दिवसापासुन वाहतुकीची कोंडी होत आहे.
आज रविवार त्यातच पावसाने उसंत दिल्याने व कोल्हापुर पासुन जवळच असणाऱ्या पन्हाळासह मसाईपठाराकडे पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात येत असल्याचे पहावयास मिळत होत्या.पर्यटकांना बंदी आदेश असुन देखील पन्हाळा व मसाई पठारावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांंच्यावर पोलिसांनी कारवाई केली.यामध्ये लाँकडाऊनच्या काळात विनाकारण घरातुन बाहेर फिरणे,बेकायदेशीर रित्या वाहनांचे पार्किग,तीबल सीट,विनापरवाना वाहन चालवणे अशा कारवाऱ्या पन्हाळा पोलिसांच्यावतीने करण्यात आल्या.दरम्यान,सध्या कोरोना संसर्गामुळे देशभरातील सर्वच पर्यटन स्थळे बंद आहेत.त्याप्रमाणेच पन्हाळा व मसाई पठार पर्यटनासाठी बंद असुन जोपर्यंत शासनाकडुन यावर निर्णय होत नाही.तोपर्यंत पर्यटकांनी विनाकारण गर्दी करु नये.असे आवाहान शाहुवाडी उपविभागाचे पोलिस उपधीक्षक अनिल कदम,पन्हाळा पोलिस निरीक्षक ए.डी.फडतरे यांनी केले आहे.
Previous Articleएस.टी. बँकेतील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात ५८ वरून ६० वर्ष करण्यास इंटकचा विरोध
Next Article महाराष्ट्रात आज 5493 नवे कोरोना रुग्ण









