वार्ताहर / उञे
पन्हाळा पश्चिम भागात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. या पावसाने शिवारात पाणीच पाणी झाले आहे. हा पाऊस शेतीपिकास पोषक असल्याने शेतकरी आनंदला आहे.
गेले पंधरा दिवस झाले पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजून गेली होती. भात पिकास व इतर ऊस,भुईमूग. मिरची. नाचना पिके वाळत होती. यामुळे शेतकरी ओढे व मोटार पंप चालू करून पाणी देत होते. पण पावसाने हजेरी लावल्याने पिके समाधानकारक असल्याने शेतकरी आनंदला आहे. यावेळी पुर नसल्याने नदीकाठच्या पिके समाधानकारक आहेत. ऊसाची वाढ व मशागत चागंली आहे. ऊस पिकावर काही ठिकाणी मावा पडला आहे. शेतकरी औषध फवारणी करत आहेत. समाधानकारक पाऊस पडत असल्याने जनावरांना वैरण वाढ झाली आहे. यामुळे दुधाची आवक वाढली आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत चागंला पाऊस पडणार असे अंदाज वर्तवण्यात आला आहे. पिके समाधानकारक असल्याने शेतकरी आनंदला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








