मासिक सभा, अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप
प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा पंचायत समितीची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती तेजस्वीनी शिंदे होत्या.यासभेत प्रशासन व सदस्यांच्यात दुफळी असल्याचे दिसुन आले.सभापती सह सर्व सदस्यांनी आपल्याला विचारात न घेता प्रशासनाचे कामकाज सुरु असल्याने नाराजी व्यक्त केली. त्याच बरोबर काही अधिकारी मनमानी कारभार करत असल्याची तक्रार करुन संबंधित अधिकाऱ्याचे पदभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात यावे.असा ठराव एकमताने समंत करण्यात आला.
यावेळी सुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाँ.बळवतकर यांचे कामकाज योग्य नसुन त्यांचे रुग्णांशी व कर्मचारी वर्गाशी उद्धट वर्तवणुक, पदाधिकारी यांच्याशी देखील वागणुक व्यवस्थित नसुन संबंधित डाँक्टरांची बदली करण्याचा ठराव करण्यात येवुन सुद्धा यावर कोणतीच कार्यवाही झालेली नसल्याने या बाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.तर पोर्ले तर्फ ठाणे येथील प्रा.आ.केंद्रास लस देणेस कोतोली प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे दुजाभाव करतात.जिल्ह्यातुन लस उपलब्ध होत असताना पोर्ले केंद्रासाठी सुद्धा लस दिली जाते.पण कोतोली येथीव वैद्यकीय अधिकारी लस पोर्ले केंद्राला देत नाहीत. तरी याबाबत चौकशी करुन कारवाई करण्याबाबात जोरदार चर्चा झाली.
तसेच प्रभारी गटशिक्षण अधिकारी हे आपल्या कामकाजामध्ये पं.स सदस्यांशी चर्चा न करता किंवा सदस्यांची मते जाणुन न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.तरी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कामकाजाची प्रशासकीय चौकशीसाठी चौकशी समिती नेमण्यात यावी.असा ठराव करण्यात आला.तर सदरचा पदभार अन्य अधिकारी वर्गाकडे देण्याचा ठराव वरिष्ठ कार्यालयाला पाठवुन देखील यावर कोणतिच हालचाल झालेली नसल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनंस व नियमाचे पालन करत पन्हाळा पंचायत समितीच्या सभाग्रुहात सभा पार पडली.यावेळी सभापती तेजस्वीनी शिंदे,उपसभापती रश्मी कांबळे,पं.स.सदस्य गीतादेवी पाटील,रेखा बोगरे,उज्ज्वला पाटील,अनिल कंदुरकर,प्रुथ्वीराज सरनोबत,रविंद्र चौगले,पी.डी.पाटील,संजय माने,पांडुरंग खाटीक,सहाय्यक गटविकास अधिकारी शरद सावंत उपस्थित होते.