प्रतिनिधी / पन्हाळा
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी संख्या वाढत असताना पन्हाळा तालुका कोरोनापासुन दुर असल्याचे वाटत होते.पण पन्हाळा तालुक्यात 12 मे ला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलाच आणि आजअखेर रुग्णांची संख्या 27 पर्यंत पोहचली आहे. या 27 पैकी 23 रुग्ण हे उपचारानंतर पुर्णपणे बरे होवुन ते कोरोनामुक्त झाले आहेत.तालुक्यात आतापर्यंत एका रुग्णांला कोरोनामुळे जीव गमवावा लागला असुन सध्यस्थिती तालुक्यात तीन रुग्ण असुन त्यांच्यावर कोल्हापुर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती गटविकास अधिकारी तुलशीदास शिंदे यांनी दिली.त्यामुळे पन्हाळा तालुक्यात परिस्थिती नियंत्रणात असल्याने दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील सातवे,मोहरे,जाखले, पोंबरे, पिंपळे तर्फ ठाणे, मानवाड, बहिरेवाडी, उंड्री, बळपवाडी, कळे, पणुत्रे, आंबवडे, हारपवडे, वाघवे, बोरिवडे, कोडोली, नावली, आसुर्ले या गावात कोरोना पाँझिडीव्ह रुग्ण आढळले होते.सध्या नावली,आसुर्ले,कोडोली या गावातील प्रत्येकी एक रुग्णावर उपचार सुरु असुन बाकी सर्व गावातील रुग्ण बरे होवुन घरी गेले आहेत.तालुक्यातील मानवाड येथील एका 35 वर्षाच्या रुग्णाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.नुकताच 12 जुन रोजी नावली व आसुर्ले येथे नव्याने रुग्ण आढळल्याने या रुग्णांच्या प्रथम संपर्कातील सर्वांचे स्वॅब अहवाल निगेटीव्ह आल्याने ही तालुक्याच्या द्रुष्टीने चांगली बातमी असल्याचे गटविकास अधिकारी शिंदे यांनी सांगितले.एकुण पन्हाळा तालुक्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे.









