अनेक गावात कडकडीत बंद
प्रतिनिधी / कोल्हापूर
शेतकऱ्यांवर लादलेले अन्याय कारक कायदे मागे घ्यावेत यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला पन्हाळा तालुक्यात उत्फूर्त पाठींबा मिळाला असून अनेक गांवात कडकडीत बंद पाळण्यात आला.
प्रसार माध्यमात व सोशल मिडीयावर गेली काही दिवस शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलनाची चर्चा व गांभीर्य सर्व भारतीयांच्या मनावर चांगलेच बिंबले होते त्यामुळे आजच्या भारत बंदला कोणताही संघटना व पक्ष रस्त्यावर उतरला नाही अथवा फिरून देखील आवाहन केले नाही अशा परस्थितीत देखील आजचा बंद उत्स्फूर्त बंद झाला. अत्यावशक सेवा सहकारी संस्था, बँका यांचे व्यवहार सुरू होते त्यामुळे वारणानगर व परिसरात तसेच मोठ्या गांवात केंद्र सरकारच्या शेती धोरणाविरुद्ध पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असल्याचे जानवत होते खाजगी दुकाने वगळता सर्व संस्था सुरळीत सुरु होत्या. त्यामुळे दुपारपर्यंत बऱ्यापैकी तुरळक वाहतूक सुरू होती.
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोडोली येथे कडकडीत बंद होता तर तालुक्यातील छोट्या पासून मोठ्या गावात बंद शांततेत व कोणताही अनूचीत प्रकार न घडता बंद यशस्वी झाला वास्तविक शेतकरी संघटनानी चार तासाचा बंद जाहीर केला होता परंतु तालुक्यात दिवसभर व्यवहार बंदच राहीला आहे. शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली,पन्हाळा,कळे पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









