प्रतिनिधी / पन्हाळा
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे.दररोज नवीन रुग्ण सापडत असुन कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढतच चालली आहे.सुरुवातीला कोरोनाचे कमी प्रमाण असणाऱ्या पन्हाळा तालुक्यात आता कोरोनाने आपला बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे.तालुक्यात आज पोर्ले येथे नव्याने तीन रुग्ण आढळल्याने तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ५६ वर पोहचली आहे.
पन्हाळा तालुक्यात गेल्या तीन दिवसापु्र्वी पोर्ले येथे पाच जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने गावात खळबळ उडाली होती.दरम्यान गावात लॉकडाऊन करण्यात आले असुन बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना अलगीकरण करुन त्यांचे स्वॅब तपासणी सुरु आहे.त्यानुसार आज पोर्ले गावातील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. काल बुधवारी तालुक्यात वारनुळ,कंरजफेण,कोतोली,पोखले येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला होता. बुधवार अखेर रुग्ण संख्या ५३ झाली होती. त्यात आज आणखी पोर्ले गावातील तीन रुग्णांची भर पडल्याने एकुण रुग्णसंख्या ५६ झाली आहे.
आज आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांना पन्हाळा कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी हलविण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली.
Previous Articleहिमाचल : 800 मीटर दरीत कोसळली बोलेरो; 4 जणांचा मृत्यू
Next Article सातारा : कोरोनाबाधित महिलेमुळे अंगापूरकर चिंतेत








