प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे.गेल्या 48 तासात तब्बल 94 नव्या रुग्णांची भर पडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे.त्यानुसार तालुक्याची रुग्णसंख्या 1161वर पोहचली आहे.
यामध्ये उंड्री 1,निवडे 1,बाजारभोगाव 2,किसरुळ 6,काळजवडे 1,नावली 1,मोहरे 2,आरळे 2,अापटी 1,पन्हाळा 11,मल्हारपेठ 1,आकुर्डे 1,कोडोली 6,पोखले 3,जोतिबा 1,पोहाळे 1,जाफळे 1,कोतोली 7,आसुर्ले 4,दरेवाडी 1,पोर्ले तर्फ ठाणे 3,घोटवडे 1,कोलोली 1,तिरपण 1,दिगवडे 7,बांदिवडे 1,पडळ 2,यवलुज 3,शिंदेवाडी 2,म्हाळुंगे तर्फ बोरगाव 2,असे रुग्ण आढळुन आले आहेत.
रविवारी तर तब्बल 77 नव्या रुग्णांची भर पडली. हा आकडा पन्हाळ्याचा उच्चांकी ठरला आहे. कोरोनाने 29 जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान पन्हाळा तालुक्याची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहान गटविकास अधिकारी तुलशीदास शिंदे व मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी केले आहे.
Previous Articleसौदी अरबने तेलाच्या किमती घटविल्या
Next Article अमुलची खाद्यतेल प्रकल्पासाठी 1500 कोटींची गुंतवणूक









