खरीपाच्या नुकसानीने शेतकरी हवालदील
वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागातील कोडोलीसह वारणा परिसरात गेली दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले असून अनेक ठिकाणच्या ओढ्यावरील मार्गावर पाणी आल्याने वहातुक बंद झाली. पाऊसाने खरिपातील भुईमूग,सोयाबीन, भात पिके कुजन जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
मुसळधार पावसाने कोडोलीतील गटारी भरून वाहू लागल्याने रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते तर कोडोलीतील नरसोबा ओढा दुथडी भरुन वाहू लागल्याने ओढ्यावरील काखे – कोडोली, सातवे – आरळे, मोहरे – सातवे पुल पाण्याखाली गेला असल्याने वहातूक खोळंबली होती. पाऊसामुळे जनजीवन पूर्णता कोसळले आहे.
वारणा कोडोलीसह परिसरात मंगळवारी दुपार पासुन मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे काढणीस आलेल्या भुईमूग, सोयाबीन, भात पिकात पाणी साचल्याने व पाऊसाने पिके पडल्याने कुजू लागण्याची शक्यता वाढली असून ही पिके हाताला लागतील का नाही अशी वेळ शेतकऱ्यांवर आली असून नुकसान झालेल्या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
मुसळधार पाऊसाने गटारी भरुन वाहू लागल्याने प्रत्येक गांवात रस्त्यावरुन पाणी वहात होते. यामुळे सखल भागात पाणी साचून राहिलने नागरिकांचे दैनंदिन कामकाज ठप्प होते. कोडोली बाजारपेठ देखील निर्मनूष्य होती. मुसळधार पावसाने कोडोली परिसरातील ओढे नाले दुथडी भरुन वाहू लागल्याने नरसोबा ओढा कधीच नव्हते येवढे पाणी आल्याने कोडोली बोरपाडळे महामार्गावर असलेल्या पुलाला पाणी लागलेने तेथे असलेले कापरे वस्तीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला होता तर काखे कोडोली रोडवर भटाचा मळा येथील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वहातूक बोरपाडळे मार्गावरील काखे फाटा या मार्गाने चालू होती तर या पुराने पुलाच भराव वाहुन गेला असल्याने वाहतुकीस धोकादायक झाला आहे. तर ओढ्याचे पाणी पात्रा बाहेर आल्याने ओढ्या काठाच्या शेतीत पाणी गेल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
कोडोली, काखे, मोहरे, सातवे, सावार्डे, आरळे या गांवात भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोडोली ता. पन्हाळा येथे कोडोली – काखे ओढ्यावरील पुलावर पाणी आल्याने वहातुक बंद. सातवे ता. पन्हाळा येथे पाऊसामुळे भातपिकांचे झालेले नुकसान
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









