प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनसुराज्यशक्ती पक्षाच्या नगरसेविका शरयु शैलेंद्र लाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासन अधिकारी म्हणुन नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी काम पाहिले.
पन्हाळा नगरपरिषदेवर जनसुराज्यशक्ती पक्षाची एकाहाती सत्ता आहे. त्यामुळे नगराध्यक्षासह उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती आदी महत्त्वाची पदे जनसुराज्यशक्ती पक्षाकडे आहेत. चैतन्य भोसले यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाया गेल्या महिन्यात राजीनाम दिल्याने हे पद रिक्त झाले होते.भोसले यांनी एकाकी गुपचुपपणे राजीनामा दिल्याने जनसुराज्यशक्ती पक्षामध्ये काही धुसफुस असल्याची चर्चा रंगली होती. त्यात डिसेंबर 2021 मध्ये विद्यामान सभाग्रुहाची मुदत संपुष्टात येणार असल्याने या पदासाठी अनेकजणांनी फिल्डींग लावली होती. यामध्ये शरयु लाड, सुशिला गायकवाड, पल्लवी नायकवडी, तेजस्विनी गुरुव, फिरोज मुजावर यांची नावे चर्चेत होती. पण पल्लवी नायकवडी यांना महिला व बालकल्याण पद व तेजस्विनी गुरुव यांना बांधकाम सभापती पद देण्यात आले. त्यामुळे गायकवाड, लाड, मुजावर यांच्यात रस्सीखेच होती. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागुन राहिल्या होत्या. पण पक्षाचे संस्थापक डॉ. विनय कोरे यांनी शरयु लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानुसार शुक्रवारी शरुय लाड यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला होता. यासाठी सुचक म्हणुन पक्षप्रतोद दिनकर भोपळे व अनुमोदक म्हणुन चैतन्य भोसले यांनी संमती दर्शवली. सदरच्या अर्जाची छाननी होवुन लाड यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला. लाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी शरयु लाड यांची उपनगराध्यक्ष म्हणुन बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
यावेळी नुतन उपनगराध्यक्षा शरयु लाड यांनी पन्हाळ्याचा पर्यटन वाढीसाठी तसेच कोरोना काळात नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटले असुन ते अधिक व्रुध्दीगंत करण्यासाठी, स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नेहमीच पन्हाळा नगरपरिषदेची कामगिरी चांगली राहिली आहे.पश्चिम विभागात यावर्षी नगरपरिषदेने पहिला क्रमांक मिळवला होता.आता देशात पहिला क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. निवडीनंतर नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी पुष्पगुच्छ देवुन नुतन उपनगराध्यक्षा यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.









