प्रतिनिधी /बेळगाव
केळकरबाग बोळ परिसरात पन्नी विकणाऱया आणखी दोघा जणांना खडेबाजार पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 40 हजार 600 रुपये किमतीच्या पन्नीच्या 116 पुडय़ा, 2 मोबाईल, 1850 रु. रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पन्नीचे वजन 29 गॅम 400 मिली इतके होते.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, हवालदार व्ही. एन. कंठीकर, एम. एस. हणगंडी, ए. बी. शेट्टी, बी. एस. रुद्रापूर, एम. व्ही. अरळगुंडी, पी. एस. सनमनी, आर. बी. गणी व अबकारी उपअधीक्षक सी. एस. पाटील आदींनी ही कारवाई केली आहे.
प्रवीण बसवराज जनकट्टी (वय 23, रा. पुडकलकट्टी, ता. गोकाक, सध्या रा. शेट्टी गल्ली), रितेश परशराम गुंडकल (वय 27, रा. चव्हाट गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत.









