ऑनलाईन टीम
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत.
सिंधुताई सपकाळ यांच्या सोबतच उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील नामवंताना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक कार्याबद्दल गिरीश प्रभुणे, साहित्याबद्दल नामदेव कांबळे, कला क्षेत्रासाठी परशुराम गंगावणे, उद्योग श्रेत्रासाठी जसवंतीबेन पोपट यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तर व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील भरीव योगदानासाठी रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान, एकूण ११९ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनाही पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच कला क्षेत्रात दिवंगत गायक एस. पी बालसुब्रमण्यम (मरणोत्तर), वाळू शिल्पकार सुदर्शन साहू, पुरातत्व तज्ज्ञ बी. बी. लाल, डॉ. बी. एम. हेगडे, नरिंदर सिंह कापन्य, मौलाना वहिदुद्दीन खान तसेच जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
Previous Articleआरोग्य दिनदर्शिका सर्वसामान्यांना मोलाची ठरेल – डॉ. अनील माळी
Next Article खानापुरात 112 क्रमांकाबाबत माहिती फलकांद्वारे जागृती









