प्रतिनिधी / पणजी
प्रख्यात चित्रकार 90 वर्षीय पद्मभूषण लक्ष्मण पै फोंडेकर यांनी बुधवारी मणिपाल इस्पितळात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. पै यांनी या लसीच पहिला डोस घेतलेला असून त्यांनी यावेळी मिश्किलपणे एक निवेदन केले, त्यात मी 90 वर्षीय व्यक्ती जर कोरोनाचा डोस घेऊ शकतो तर मग इतरांनी देखील बिनधास्तपणे हा कोरोनाच डोस घ्यावा. जणेकरून आपला गोवा व आपला देश कोरोनामुक्त व्हावा. श्री पै यांना कोरोना प्रतिबंधक लस प्रत्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनीच टोचली.









