नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन यंदा पदवीपूर्व प्रवेशासाठी (अंडरग्रॅज्युएट ऍडमिशन) प्रवेश परीक्षा (एन्ट्रन्स टेस्ट) घेतली जाणार नाही, अशी घोषणा विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) केली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2021-2022 साठी सीयुसीईटी घेतली जाणार नाही. विद्यापीठांमध्ये प्रवेश एका कॉमन एन्ट्रन्स परीक्षेच्या माध्यमातून दिला जाईल अशी घोषणा आधी शिक्षण विभागाने केली होती. 1 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठ आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी सर्व प्रवेश पूर्ण केले जावेत असा आदेशही युजीसीने काढला आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून या प्रवेशांसाठी दाखले 30 सप्टेंबरपर्यंत दिले जावेत असेही युजीसीने स्पष्ट केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.









