मुंबई \ ऑनलाईन टीम
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात खासदार नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या शपथविधीत सर्वात प्रथम नारायण राणे यांनी शपथ घेतली. यानंतर आज मंत्रीपदाचा पदभार स्वीकरला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवेसना खासदार संजय राऊत यांचावर जोरदार निशाणा साधला आहे. नारायण राणे यांनी माध्यमांशी अभिनंदन करावं एवढं मोठं मन मुख्यमंत्र्यांचं नाही, असा जोरदार टोला मुख्यमंत्र्यांना लगावला. संजय राऊतला काहीना काही बोलायचंच असतं. ते चांगले नाही वाईटं तेचं बोलायचे असते. अशी टीका संजय राऊतांवर केली आहे.
उद्धव ठाकरेंना फोन करुन शुभेच्छा दिल्या का असं विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले की, नाही त्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यांचं मन इतकं मोठं नाही. पण त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी संपूर्ण महाराष्ट्र आणि जिल्ह्यांमधून मला शुभेच्छा मिळाल्यात या मी त्यांच्या शुभेच्छा समजतो”. दरम्यान शरद पवारांनी मला शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्याची माहिती नारायण राणे यांनी यावेळी दिली.
संजयला सांगेन खातं बरं वाईट नसतं, काम कसं करतो हे महत्त्वाचे असते. या खात्याला मी न्याय देईन तेव्हा संजय राऊतचं म्हणतील, खरोखर हे खातं चांगल होतं. मोठं होत.. महत्त्वाचे होते असा अभिप्राय देतील, अशी टीकाही राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.
गणरायाचे आशिर्वाद घेऊन माझ्या कामकाजाला सुरुवात केली. केंद्रीय मंत्रीमंडळात मला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे प्रवेश मिळाला आहे. म्हणून मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो त्यांचे ऋण व्यक्त करतो. त्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आशिर्वाद सहकार्य आहे. त्यांचाही मी अतिशय ऋणी आहे. पंतप्रधानांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरवण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास देखील नारायण राणेंनी व्यक्त केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








