प्रतिनिधी / बांदा:
गोवा राज्य सीमेवरील पत्रादेवी येथील लाठी प्रशासनाकडुन पुन्हा बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दुदैवी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्रशासनाने जनजागृती करावी कायद्याचा बडगा दाखवून कोणाची अडवणूक करू नये. अन्यथा बेकारी आत्महत्यांचे प्रमाण वाढेल अशी मागणी भाजप युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बांद्याचे ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब यांनी केली आहे.
लोकांना होणारा त्रास लक्षात घेता जिल्हाधिकारी आणी प्रशासनाने योग्य तो तोडगा काढून सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा याबाबत आम्ही केद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेवून पुढील निर्णय घेवू असा इशारा त्यांनी दिला आहे.
बांदयाच्या सिमेवर असलेली पत्रादेवी लाठी काल सायंकाळी पासून पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. याबाबतचे निर्णय जिल्हाप्रशासनाकडुन देण्यात आले असे सांगून येथिल पोलिसांनी पुन्हा त्या ठीकाणी लाठी सुरू केली आहे. मात्र सदयस्थिती परिस्थिती लक्षात घेता याचा फटका संपुर्ण जिल्ह्याला सहन करावा लागत आहे. एकीकडे कोरोनामुळे सगळ्याचे हाल सुरू आहेत. अशा परिस्थिती जगायचे कसे असा प्रश्न सर्वासमोर आहे त्यामुळे अशा प्रकारे लाठी बंद करण्यात आल्यानंतर आर्थिक व्यवहार होणार कसे असा प्रश्न खतिब यांनी केला आहे.
दरम्यान चार दिवस लाठी काढून टाकण्यात आल्यामुळे बांद्याच्या बाजारपेठेत चैतन्य होते अनेक दिवसांनी व्यापारी तसेच सर्वसामान्य खूश होते परंतू पुन्हा लाठी बंद झाल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका घेवून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी श्री खतिब यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









