प्रतिनिधी/ म्हापसा :
महाराष्ट्र सिंधुदुर्गाहून राज्यात कुणीही प्रवेश करू नये म्हणून पत्रादेवी बॉर्डरवर उपनिरीक्षक दत्तप्रसाद नानोडकर यांच्या देखरेखीखाली सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस वर्ग येथे सर्वत्र बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
या बॉर्डरवर काल 7 जण संशयित आढळून आल्यावर त्यांना कोरनटाईन करण्यात आले असून त्यांना जिंजर हॉटेल म्हापसा रेझीडन्सी व जुने गोवा रेझीडन्सीमध्ये पाठवून देण्यात आले आहे.









