पेडणे (प्रतिनिधी )
महाराष्ट्र आणि गोव्यात सध्या कोरोना रुग्ण मोठय़ा संख्येने सापडत असल्याने सीमाभागातील नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न आता ऐरणीवर असून या भागातील नागरिकांची चिंता आता वाढू लागली आहे.
सिंधुदुर्ग आणि गोवा कोरोनामुळे डेंजर झोनच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे .याच पाश्वभूमीवर काही पेडणे तालुक्मयातील नागरिक चक्क पत्रादेवी चेक नाक्मयावरून पोलीसांच्या समक्ष बांदा बाजारात जावून आपल्याला हवे ते समान जीवनावश्यक वस्तू आणत असल्याने चित्र दिसत असल्याने नाक्मयावर खळबळ माजली आहे . नाके परत एकदा असुरक्षित असल्याचे चित्र दिसत आहे .
पत्रादेवी चेक नाक्मयावर दिवसाचे चोवीस तास पोलीस कर्मचारी , मामलेदार , उपजिल्हाधिकारी डोळय़ात तेल घालून आणि आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धा बनत आहे . या पोलीसानाही , कर्मचाऱयांना , घरसंसार मुलबाळं, कुटुंब आहेत . त्याचा नागरिकांनी विचार करायला हवा . पोलिसांच्या पस्थितीत तालुक्मयातील काही नागरिक थेट बांदा बाजारात जावून सामान आणत असल्याचे उघड झाले आहे . त्यामुळे परत एकदा पत्रादेवी चेक नाका व त्यावरील सुरक्षा धोक्मयात आली आहे . नागरिकच बेजबाबदारपणे वागून चेक नाक्मयावरून थेट बांदा बाजारात जातात आणि समान घेवून येतात . काही नागरिक अजूनही डोंगर माळरानावरून चोरवाटातून बांदा बाजारात जावून समान घेवून येतात . हे चित्र सकाळी पहावयास मिळत आहे . काही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने पोलीस बंदोबस्त विषयी संशय येतो . वरि÷ अधिकाऱयांकडून पोलिसाना कटू शब्दात बोलणे खावे लागते. तेही कर्मचारी आपला जीव धोक्मयात घालून आपली डय़ुìाr करत आहेत . त्यांच्या मुलाबाळांचा , घराचा विचार करून हे नागरिक करत नाहीत हे नागरिक जबाबदारीने का वागत नाही . असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे .
पेडणे तालुक्मयातील सर्व प्रकारची दुकाने सामान जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असताना , काही सीमा भागातील नागरिक बेजबाबदारपणे लॉकडाऊन काळात चक्क बांदा बाजारात जावून सामान घेवून येतात . सिंधुदुर्गात मोठय़ा प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तालुक्मयातील सीमा भागातील नागरिक मुद्दाम का बांदा बाजारात जावून आपला जीव धोक्मयात घालतात . शिवाय इतराना संकटात घालण्याचे काम का करतात असा सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळी यांनी उपस्थित केला आहे .
पत्रादेवी चेक नाक्मयावर अर्ध्या किलोमीटर वर बांदा बाजार आहे. हा बाजार प्रसिद्ध बाजार , या ठिकाणी सर्व प्रकारचे समान , घावूक व किरकोळ स्वस्त दराने उपलब्ध आहे . पत्रादेवी , तोरसे , उगवे , मोपा , फकीरपाटो ,चांदेल हसापूर, वारखंड , पोरस्कडे आदी भागातील नागरिक या बाजारावर अवलंबून आहे . मात्र लॉकडाऊन काळात या सीमा बंद असल्यामुळे काही नागरिक मुद्दाम बांदा बाजारात आजही चोर वाटातून जावून सामान आणतात . हा प्रकार लॉकडाऊन काळानंतर पंधरा दिवसापासून चालू आहे . लोकांची गरज आणि माणुसकी लक्षात घेवून महाराष्ट्र व राज्यातील पोलीस गांभीर्याने घेत नाही . त्याचा फायदा घेत नागरिक बेजबाबदारपणे वागत आहे . आणि दुसऱया बाजूने बांदा पत्रादेवी अंतर्गत रस्त्यावरील सीमा खुली करा असहीही काही प्रति÷ाrत नागरिक मागणी करत आहेत .
सरकारने आणि स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी वारंवार जे सीमा भागातील नागरिक बांदा बाजारात जावून सामान घेवून आपला जीव धोक्मयात घालत आहेत त्याना सर्व प्रकारचे समान त्या त्या परिसरात उपलब्ध करून द्यावे अशी मागणी समोर येत आहे .
मोपा विमानतळाच्या कामावर जाणारे ट्रक रोखाः उपसरपंच सुबोध महाले . उगवे मोपा उपसरपंच सुबोध महाले यांनी प्रतिक्रिया देताना लॉकडाऊन काळात शेकडो ट्रक मोपा विमानतळाचे काम करण्यासाठी सामान व कामगार घेवून येतात त्यांना अगोदर रोखण्याची गरज आहे . जे काही गरजवंत दैनदिन गरजेसाठी बांदा समान आणायला जातात त्याना कोरोनाची बांधा नाही . माञ महाराष्ट्र राज्यातून येणारे ट्रक वरील चालक व क्लिनर यांची तपासणी होत नाही. यामुळे आमच्या गावात नागरिकांमध्ये भितीची वातावरण असून स्थानिकांना रोखण्यापेक्षा बाहेरुन येणाऱया दरदिवशी शेकडो ट्रक मोपा विमानतळावर येतात त्यांना रोखण्याची मागणी सुबोध महाले यांनी केली आहे .









