गुजरातमधील ट्रकचालक, क्लिनरला अटक
पेडणे / प्रतिनिधी
पेडणे अबकारी विभागाने पत्रादेवी मार्गे बेकायदेशीररित्या चोरटी दारु वाहतूक करणारा गुजरातचा ट्रक पकडून त्यात असलेली 17 लाख रुपयांची दारु, ट्रक जप्त करुन चालक व क्लिनर यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे. पेडणे अबकारी विभागाने 13 सप्टेंबर रोजी 9 लाखाची बेकायदा दारू तसेच वाहनही जप्त केले होते. काल परत अवघ्या दहा दिवसांत पत्रादेवी चेकनाक्मयावर 17 लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे.
मडगाव येथून जीजे 06 ए व्ही-7687 हा ट्रक गुजरातला जाण्यासाठी पत्रादेवी चेकनाक्मयावर पोचला असता अबकारी अधिकाऱयांना संशय असल्याने ट्रक थांबवण्यात आला. ट्रकमध्ये अगोदर नारळाच्या पिशव्या होत्या. त्यानंतर मागे बियर, रम, व्हिस्की असे दारूचे खोके होते. ही दारु किमान 17 लाखाची होती. हे वाहन कुठे जात होते, दारू कुणाला नेली जात होती, याची माहिती ज्यावेळी संशयित चालक व क्लिनर यांना जामीन देण्यासाठी मालक येईल त्यावेळी सविस्तर माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती अबकारी अधिकारी सुरेखा गोहर यांनी दिली.
ही कारवाई अबकारी अधिकारी सुरेखा गोहर यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक दामोदर लोलयेकर, दिगंबर कुंकळकर, बिनदेश पेडणेकर, अर्जुन गावस, आशिश फर्नांडिस, विश्वास केणी, रामा बगळी, नितेश मालवणकर, वसंत नाईक, प्रसाद नाईक, नितीन परब, दशरथ तारी व सर्वेश नाईक आदींनी कारवाई केली.
वाहन चालक वीरेंद्र कुमार व क्लिनरला अटक करण्यात आली आहे.









