ऑनलाईन टीम/तरुण भारत
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या दहा दिवसांपासून युद्ध सुरु आहे. रशिया युक्रेनच्या महत्वाच्या शहरांवर हल्ले करत आहे. रशियाला जगभरातून विरोध होत आहे. तसेच सुरू असलेल्या या युद्धाला अनेक रशियन लोकांचा देखील विरोध आहे. रशियाच्या एक आघाडीच्या वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांनी युद्धाला नकार देत ऑन एअर राजीनामा दिला आहे. या सर्व कर्मचार्यांनी त्यांच्या अंतिम प्रसारणात “नो टू वॉर” म्हणत राजीनामा दिला. रशियन अधिकार्यांनी युक्रेन युद्धाच्या कव्हरेजबद्दल त्यांचे ऑपरेशन स्थगित केल्यानंतर टीव्ही रेनच्या कर्मचार्यांनी हा निर्णय घेतला.
रशिया-युक्रेन युद्ध थांबावं यासाठी रशियाच्या शेवटच्या स्वतंत्र वृत्तवाहिनींपैकी एक असलेल्या या वाहिनीवरील पत्रकारांनी शांततेसाठी भूमिका घेण्याचे ठरवले. या कर्मचार्यांनी स्टुडिओमधून बाहेर पडताना चॅनेलच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या नतालिया सिंदेयेवा “नो टू वॉर” म्हणजेच युद्धासाठी नाही म्हणाल्या. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान युक्रेनवरील हल्ला हा अनेकांच्या पचनी पडलेला नाही. रशियातील नागरिकांनाही हे युद्ध नको आहे. त्यांनी रशियाच्या भूमिकेला विरोध करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्वतःच्या देशातून होणार विरोध रशियाला महागात पडू शकतो.









