कुपवाड / प्रतिनिधी
पत्नी माहेरी गेल्याने नैराश्येतून पतीने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना तानंगमध्ये बुधवारी रात्री घडली. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
कृष्णात ज्ञानू जाधव (वय ४२ रा. शिवाजी चौक) असे आत्महत्त्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पत्नी माहेरी गेल्यामुळे हा तरुण गेल्या दिड वर्षांपासून एकाकी पडला होता. याच नैराश्येपोटी त्याने बुधवारी रात्री घरातील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमधील लोखंडी ॲगलला दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी याबाबत कुपवाड पोलिसात नोंद झाली. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.









