रत्नागिरी-मिरजोळे पडवेवाडी येथील घटना
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या मिरजोळे पडवेवाडी येथे पत्नीचा खून करन पतीने गळफास घेतल्याची घटना 18 मे 2021 रोजी घडली होत़ी पोलीस तपासात आता पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातूनच पतीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समोर आले आह़े त्या दृष्टीने पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आह़े
रोहित राजेंद्र चव्हाण (29) व त्याची पत्नी पूजा रोहित चव्हाण (28, ऱा ओमविहार संकुल, पडवेवाडी मिरजोळे-रत्नागिरी) अशी या पती-पत्नींची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुहार, रोहित व पूजा यांचा 10 वर्षापूर्वी नाशिक येथे प्रेमविवाह झाला होत़ा यानंतर ते रत्नागिरी येथे स्थायिक झाले होत़े दोघेही रत्नागिरी येथील कंपनीत कामाला होत़े दरम्यान काही कारणांमुळे रोहित याला आपली नोकरी गमवावी लागल़ी यामुळे रोहित हा मागील दीड वर्ष घरीच होत़ा त्यांना एक मुलगीही झाली होत़ी दरम्यानच्या काळात पत्नी पूजा हिचे अनैतिक संबध आहेत, असा संशय रोहित याला येत होत़ा यातूनच त्यांच्यात सातत्याने वाद होत होत़ा याच रागातून 17 मे 2021 च्या रात्री रोहितने मुलीला हॉलमध्ये झोपवले होत़े तर स्वतः पत्नीसोबत तो बेडरूममध्ये होत़ा यावेळी रोहितने ओढणीच्या सहाय्याने पत्नी पूजा हिचा गळा आवळून खून केल़ा तर स्वतः पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल़ी
यानंतर 18 मे रोजी सकाळी झोपेतून उठलेल्या मुलीला बेडरूमचा दरवाजा बंद असल्याचे लक्षात आल़े मुलीने दरवाजा ठोठावून आई-वडिलांना हाक मारण्याचा प्रयत्न केल़ा मात्र आतून कोणताही प्रतिसाद तिला मिळाला नाह़ी यावेळी मुलीने शेजारी राहणारे विशाल चौगुले यांना ही गोष्ट सांगितल़ी यानंतर हा प्रकार उघडकीस आल़ा पोलिसांना घटनास्थळावरून रोहित याने लिहिलेली चिठ्ठी आढळली होत़ी यामध्ये त्याने पत्नीशी घटस्फोट घेण्याबद्दल उल्लेख केला होत़ा त्यानुसार पोलिसांकडून तपासाची चपे पुढे सरकल़ी









