प्रतिनिधी/वारणानगर
लग्न झाल्यापासून पत्नीसोबत अनैसर्गिक शारिरीक सबंध ठेवण्यासाठी मारहाण, मित्रासोबत विनयभंग, माहेरहून मोटर सायकल व सोन्याची अंगठी देण्यासाठी सासू व ननंद यांच्या सांगण्यावरून होणारा छळ केल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या मित्रासह सासू ननंद अशा चौघावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप निवृत्ती सुर्यवंशी, सासु मालन, मित्र संतोष अनुशे (सर्व रा. काखे ता.पन्हाळा) व ननंद सुवर्णा काळे (रा. पोवार कॉलनी,पाचगांव, कोल्हापूर) अशा चौघां विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणाला अटक झालेली नाही.
सुर्यवंशी डहाणू ता. पालघर येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांचा विवाह झाला आहे. पत्नीला नोकरीच्या ठिकाणी घेवून गेल्यावर संसाराला सुरवात झाल्यावर त्याने ब्ल्यू फिल्म दाखवत आपले प्रताप दाखवायला सुरवात केली. तर बहिण सुवर्णा सांगेल तसा पत्नीला त्रास देत होता. रोजची शिवीगाळ मारहाण सुरू असताना डहाणू येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी यानी देखील अनेक वेळा हा वाद मिटवला तरी देखील संदीपचे त्रास देणे थांबेना. अशातच जवळचा मित्र संतोष अनुशे याला बोलवून स्वताच्या पत्नीला त्रास देण्यासाठी वारंवार तो मित्राला घरी बसवत होता. याप्रकरणी या चौघां विरोधात कोडोली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे, फौजदार नरेद्र पाटील करीत आहेत.
Previous Articleसोलापूर शहरात 90 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, 5 जणांचा मृत्यू
Next Article नदाल माद्रिद ओपन स्पर्धेत खेळणार








