विटा/प्रतिनिधी
येथील कराड रस्त्यावरील एका हॉटेलच्या पाठीमागे परप्रांतीय मजूर महिलेचा तिच्या नवऱ्याने धारदार शस्त्राने वार करून खून केला. लीलावती नरेश साह(३२) असे मयत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवार 30 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयत लीलावती यांचा पती संशयित नरेश साह याला विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत माहिती मिळताच विटा उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली.









