बेळगाव : पतंजली युवा भारततर्फे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता श्री बसवाणा महादेव मंदिर, नेहरुनगर येथे शहीद दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सुषमा बर्डे, ओ. एफ. गौडा, पुरुषोत्तम पटेल यांच्या हस्ते फोटोंना हार घालून पूजन करण्यात आले.
प्रारंभी चंद्रकांत खंडागळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ज्या देशभक्तांनी आपल्या देशासाठी जीवन समर्पित केले. ज्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्य भोगत आहोत. त्यांचे सतत स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या करिता शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या चरणी मी आपल्या सर्वांच्यावतीने नमन करतो, असे मत व्यक्त केले. दमयंती पाटील यांनी शहीदांचा इतिहास सांगताना जालियनवाला बागमध्ये झालेल्या असंख्य लोकांच्या हत्येमुळे या शहीदानी त्यांचा बदला घेण्यासाठी इंग्रजांना सळो की पळो केले आणि आपल्या देशासाठी आपले जीवन बलिदान दिले, असे सांगितले. यावेळी किरण मन्नोळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मोहन बागेवाडी यांनी देशभक्ती गीत सादर केले. शांतीपाटणी कार्यक्रमाची सांगता झाली.









