ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पतंजलीने कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. ‘कोरोनिल’ असे या औषधाचे नाव असून, आज दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात या औषधाचे लाँचिंग करण्यात येणार आहे. आचार्य बालकृष्ण यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी हे औषध तयार केले आहे. आचार्य बालकृष्ण या औषधाचे लाँचिंग करतील. यावेळी योगगुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यातील निकाल सर्वांसमोर ठेवणार आहेत. सध्या या औषधाचे उत्पादन हरिद्वारमधील दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड करत आहेत.
‘कोरोनिल’ हे औषध कोरोनाबाधितांना 5 ते 14 दिवसात पूर्णपणे बरे करते, असा दावा बाळकृष्ण यांनी केला आहे. जयपूर आणि इंदोरमध्ये या औषधाची चाचणी घेण्यात आली आहे.