आर.आर.पाटील जिल्हा सुंदर गाव 2019-20 स्पर्धा : 2018-19 चे पुरस्कार कसाल-कुंब्रलला
तालुका, जिल्हास्तरीय प्रमाणपत्र वितरण आज
प्रतिनिधी / ओरोस:
आर. आर. पाटील सुंदर गाव योजनेंतर्गत सन 2019-20 साठी पणदूर ग्रामपंचायतीची निवड झाली आहे. जि. प. अध्यक्ष सौ. समिधा नाईक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जिल्हास्तरावरील 40 लाख रुपयांचे पारितोषिक या ग्रामपंचायतीला मिळणार आहे. यावेळी ग्रामपंचायत उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. दीपाली पाटील उपस्थित होत्या.
दरम्यान सन 2018-19 आणि सन 2019-20 अंतर्गत निवड झालेल्या तालुका व जिल्हास्तरावरील सर्व ग्रामपंचायतींना 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात प्रमाणपत्र वितरीत करून सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण तसेच पारदर्शकता व तंत्रज्ञान ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करून त्यांना पुरस्कार देण्याची जिल्हा स्मार्ट ग्राम ही योजना सन 2016-17 पासून सरकारने सुरु केली होती. तालुकास्तरावर प्रथम येणाऱया ग्रामपंचायतीला 10 लाख, तर जिल्हास्तरावर प्रथम येणाऱया गामपंचायतीला 40 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते. या योजनेचे आता ‘आर. आर. (आबा) पाटील जिल्हा सुंदर गाव’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेंतर्गतचे पुरस्कार आर. आर. (आबा) यांच्या पुण्यतिथी दिनी प्रदान करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठीच्या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी कुडाळ तालुक्मयातील कसाल, मालवण तालुक्मयातील मालोंड, देवगड तालुक्मयातील पावणाई, वेंगुर्ले तालुक्मयातील मठ, दोडामार्ग तालुक्मयातील कुंब्रल, कणकवली तालुक्मयातील असलदे, वैभववाडी तालुक्मयातील नावळे आणि सावंतवाडी तालुक्मयातील न्हावेली आणि इन्सुली या गावांची निवड करण्यात आली होती. त्यातील कसाल आणि कुंब्रल या ग्रामपंचायतींना जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून विभागून नंबर देण्यात आला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी 20 लाख रुपये विभागून दिले जाणार आहेत.
सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी कुडाळ तालुक्मयातील पणदूर, मालवण तालुक्मयातील हडी, देवगड तालुक्मयातील कुणकेश्वर, वेंगुर्ले तालुक्मयातील कुशेवाडा, दोडामार्ग तालुक्मयातील तळकट व केर भेकुर्ली, कणकवली तालुक्मयातील ओटव, वैभववाडी तालुक्मयातील करुळ आणि सावंतवाडी तालुक्मयातील टेंब या ग्रामपंचायतींचे तालुकास्तरीय सुंदर गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. यामधून जिल्हास्तरीय पुरस्कारासाठीच्या मूल्यांकनात पणदूर ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचे सौ. नाईक यांनी स्पष्ट केले.









