मार्केट उद्यापासून लॉकडाऊन – महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
प्रतिनिधी /पणजी
पणजी मार्केट मधील बारमालक कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे खबरदारी म्हणून दिनांक 12 जून पासून चार दिवस पणजी मार्केट सह मासळी व मटण बाजारही बंद राहतील असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले आहे. बारमध्ये येणाऱ्या कामगारामुळे 44 कामगारांची कोरोना चाचणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पणजी मार्केट मध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. करुणा पॉझिटिव्ह असलेला बारमालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली आहे.









