प्रतिनिधी/ पणजी
गोवा वनविकास महामंडळातर्फे दि. 15 रोजी व दि. 16 रोजी काजू महोत्सव गोवा 2023चे दुपारी 3 वाजल्यापासून दयानंद बांदोडकर मैदान कांपाल येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, बंदर व पर्यटन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा विधानसभेचे सभापती व काणकोणचे आमदार रमेश तवडकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, ईडीसीचे अध्यक्ष सदानंद तानावडे उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर कृषीमंत्री रवी नाईक, पर्यावरणमंत्री निलेश काब्राल, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, महसूल व कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात, सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर, गोवा वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. देविया राणे, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, मुख्य सचिव डॉ. पुनित गोयल आएएस, मुख्dया वनसंरक्षक अधिकारी राजीव कुमार आएफएस उपस्थित राहतील.
शनिवार दि. 15 रोजी दुपारी 3 वा. ते सायं. 6 वाजेपर्यंत परिसंवाद होतील. त्यानंतर सायं. 6 वा. काजू महोत्सवाचे उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर सायं. 7.35 वा. रागाज टू रिचिस या बॅण्डचा सांगितिक कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री 8.30 वा. शोर पोलीस या बॅण्डचा कार्यक्रम होईल. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दि. 16 रोजी दुपारी 3 वा. ते सायं. 6 वाजेपर्यंत परिसंवाद होतील. त्यानंतर सायं. 6.45 वा. ते सायं. 7.35वाजेपर्यंत गोव्याची गानकोकिळा लॉर्ना यांचा कार्यक्रम होईल. सायं. 7.50वा. ते 8.30वाजेपर्यंत वर्मा डिमेलो यांचा पॅशन शो, तर रात्री 8.30 वा. ते 10 वाजेपर्यंत स्टेबिन बेन यांचा संगीताचा कार्यक्रम होणार आहे.









