प्रतिनिधी / पणजी
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे लॉकडाऊन असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. रिक्षाचालक तसेच दुचाकी पायलट यांचा हा दिवसाचा व्यवसाय होता व त्यावर त्यांचे जीवन होते परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर वाईट परिस्थिती ओढावली आहे. सरकारने आम्हाला पॅकेज द्यावे अशी मागणीही या चालकांनी केली पण त्यांना सकारात्मक उत्तर मिळाले नाही. केवळ 100 रुपयांची वस्तू घेण्यासाठीही विचार करावा लागतो अशी परिस्थिती चालकांची असल्याची मा†िहती श्री मारुती देवस्थान संस्थानचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी व्यक्त केले.
या सर्व चालकांना मतद म्हणून राज तेंडुलकर समोर आले असून त्यांनी पणजी येथील चालकांना गरजू वस्तू दिल्या तसेच दत्तगुरु सावंत यानीही मदत केली. संजय मंगेशकर यांनी सांगितले की, चालक या लॉकडाउढनला पूर्णपणे सहकार्य करत आहे. त्यांचा व्यवसाय हा घरातून बाहेर पडल्याशिवाय होत नाही. त्यामुळे सद्या त्यांना उत्पन्न नाही. आम्हाला जमेल तशी मदत आम्ही त्यांना केली आहे. प्रसंगी उपस्थित चालकांनी चांगल्या दर्जाच्या वस्तू पुरविल्याबद्दल राज तेंडुलकर यांचे ऋण व्यक्त केले.









