महापौर उदय मडकईकर यांची माहीती : स्मार्ट सिटी अंतर्गंत अनेक कामे हाती : आमदार बाबुश मोन्सेरात यांनी केली पाहणी
प्रतिनिधी / पणजी
शुक्रवारी ताज विवांता हॉटेल समोरील असलेल्या नाला व आजुबाजुच्या परीसराला पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी भेट घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापौर उदय मडकईकर, नगरसेवक सोराया पिंटो मखीजा, स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकिय संचालक स्वयंदिप्ता पाल चौधरी, मुष्टीफंड उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रत्नाकर लेले उपस्थित होते.
नाल्याजवळ असलेल्या या रस्त्यावर भुमिगत अनेक केबल्स घालून नंतर पेवर्स घालण्यात आले आहे. तसेच येथे उत्तम दर्जाचे विजेचे खांब घालण्यात आले आहे. स्मार्टसिटी अंतर्गंत सर्व कामे करण्यात आले आहे. योग्य नियोजन करुन सर्व कामे करण्यात आली आहे. अशी माहीती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.
स्मार्टसिटी अंतर्गंत येणाऱया काही महिन्यामध्ये अनेक कामे हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने पणजी मासळी मार्केटसाठी नविन इमारत, रायबंदर मार्केट, काकुलो आयलंड ते आदर्श रस्त्याचे नुतनीकरण यांचा समावेश आहे. लवकरच याबाबत निविदा काढण्यात येणार असून, यानंतरच कीती खर्च होईल हे सांगता येणार आहे. नोव्हेंबर शेवटी किंवा ऑक्टोंबर सुरुवातीला सदर कामे सुरु होणार आहे. असे मडकईकर यांनी पुढे सांगितले. पणजीत पावसाळय़ात पुरसदृष्य स्थिती असते याच अनुषंगाने पाहणी करण्यात आली आहे. भूमिगत केबल्सची योग्यरित्या व्हिलेवाट लावणे, योग्य गटारे व पदपाथ बांधणे, नाल्यासाठी खास योजना यावर भर देण्यासाठी पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात कार्यशील आहे. असे मडकईकर यांनी पुढे सांगितले.









