प्रतिनिधी / सांगली
आमदार गोपीचंद पडळकर हा मनोरुग्ण राज्यभर काहीही बरळत फिरत आहे. प्रसिद्धीपिपासू असा हा नेता आहे. पडळकर ही पीडा भाजपची माती केल्याशिवाय राहणार नाही. ज्या व्यक्तीने जनतेला, समाजाला, देवाला फसवले, अशा व्यक्तीला फार प्रसिद्धी देऊ नका. मोठ्या नेत्यांना नावे ठेवण्याशिवाय दुसरं काम करत नाही, अशी टीका शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी पत्रकार बैठकीत केली.
विभूते म्हणाले, गोपीचंद पडळकर हा केवळ प्रसिद्धीसाठी असले स्टंट करत असतो. त्याला फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आघाडीमधील एक ही नेता त्याला गांभीर्याने घेत नाही. प्रसार माध्यमांनीही त्याला जास्त महत्व देऊ नये. दुर्लक्ष करावे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, बजरंग पाटील, मयुर घोडके, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








